कुस्ती हा खेळ ग्रामीण महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ आहे. पूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पहिलवान असायचा. परंतु आजच्या आधुनिक काळात कुस्ती खेळ लोप पावत चालला आहे. गावोगावच्या तालमी देखील बंद झाल्या आहेत. परंतु सोलापूर पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या केगाव गावात गेल्या शंभर वर्षापासून हा खेळ टिकवून ठेवला आहे. कुस्ती खेळाविषयी जाणून घेवूयात पैलवान राणू दोरकर यांच्याकडून..