EVM मशीन वापरलं तर विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार – प्रकाश आंबेडकर 

Update: 2019-06-08 14:42 GMT

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा EVM मशीनद्वारेच मतदान घेण्यात आलं तर वंचित बहुजन आघाडी त्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकेल, अशी स्पष्ट भूमिकाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलीय. EVM मशीनमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलंय. EVM मशीनवर आपला अजिबाद विश्वास नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणूका या बॅलेट पेपरवर केल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

विधानसभेच्या निवडणूकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होणार नसेल तर आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांनाही आवाहन करणार अशल्याचं आंबेडकर यांनी सांगितलंय. वंचित बहुजन आघाडी सारखी भूमिका महाराष्ट्रातल्या इतर राजकीय पक्षांनीही घ्यायला हवी. मात्र, मी माझ्या मतावर ठाम आहे आणि ते हेच आहे की बॅलेट नसेल तर विधानसभा लढणार नाही. आता माझं मत आमच्या आघाडीतील किती जणांना आवडेल याविषयी आत्ताच सांगता येत नाही, पण या मताशी सहमती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

Similar News