VIDEO: अर्ज भरायला व्हीलचेअरवर गेलेल्या प्रज्ञासिंह यांनी प्रचारसभेत धरला ठेका

Update: 2019-04-27 05:07 GMT

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह यांनी सोमवारी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करायला येताना साध्वी व्हीलचेअरवर आल्या होता. मात्र, मतदारसंघात प्रचार करताना प्रज्ञासिंह यांच्या पायात अचानक ताकद आली आणि त्या ठेका धरत नृत्य करु लागल्या.

सध्या प्रज्ञासिंह आपल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. प्रचार करताना एका सिंधीबहुल परिसरात पोहोचलेल्या प्रज्ञासिंह यांनी तेथील महिलांसोबत नृत्य केले. आता प्रचारफेरीमधील प्राज्ञासिंह यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना व्हील चेअरवर जाणाऱ्या प्रज्ञासिंह प्रचारामध्ये नाचू कशा लागल्या? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी अर्ज भरताना प्रज्ञासिंह या खुर्चीवर बसून आल्या होत्या. यावेळी त्यांनी भोपाळ शहरात मोठा रोड शो केला. मात्र, यावेळी देखील प्रज्ञासिंह प्रचारफेरीत अशा प्रकारे सहभागी झाल्या नाहीत. तब्बेत ठीक नसल्याने प्रज्ञासिंह बऱ्याचदा व्हील चेअरवरच असतात. क्वचितच त्या चालताना दिसतात. तसेच चालताना त्यांना शीडी चढण्यासाठी वगैरे इतरांची मदत लागते. मात्र, सध्या त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी त्या खरच आजारी आहेत का? असा सवाल उपस्थित केला असून त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रकृतीच्या कारणामुळे जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

Full View

Similar News