केजरीवालांचं हे भाकीत खरं झालं तर काय होईल?

Update: 2019-05-10 07:16 GMT

अरविंद केजरीवाल यांच्या मते देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असतील, असा दावा केला आहे. ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल, त्या देशाची परिस्थिती काय होईल? याचा विचार करुन जनतेने मतदान करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. या संदर्भात केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे.

आता केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार जर अमित शाह गृहमंत्री झाले तर देशात काय परिस्थिती होईल या बाबत भाष्य करणं आज तरी अतिशयोक्ती ठरेल. मात्र, अमित शाह गृहमंत्री झाले तर राजनाथ सिंह यांचा गृहमंत्री पदावरुन पत्ता कट होणार आहे. कारण अमित शाह यांची अध्यक्ष पदाचा कालावधी संपल्यानं त्यांचा मोदी मंत्रिमंडळामध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. अशा वेळी अमित शाह यांना मंत्रिमंडळातील पॉवरफूल असं गृहमंत्री हे खातं दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजनाथ सिंह देखील अस्वस्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीच्या 7 जागांवर मतदान होत असून दिल्लीत भाजप, कॉंग्रेस या पक्षांसह आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Similar News