महाराष्ट्रात आदिवासींचे २५ आमदार आणि ४ खासदार आहेत. तरीही आदिवासींचे मुलभूत प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेले नाही. आदिवासींच्या मृत्यूचे प्रमाणही महाराष्ट्रात जास्त आहे. आदिवासींच्या आरोग्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यावर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचं संसदेत आणि विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार काय करतात? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय दाभाडे यांनी केला असून आदिवासींच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचं मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.