वर्धा : उमेदवारांसह नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Update: 2019-04-11 07:05 GMT

सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदार संघांचा समावेश असून अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

आज वर्धा इथं पाहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून जिल्ह्यातील २०२६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेसह पाच तालुक्यांचा समावेश आहे. आज हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथे सकाळी ७ वाजता पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी जमली होती. वर्ध्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३२ टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. दरम्यान मोलमजुरीला जाणाऱ्या मतदारांनीदेखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे. तसेच वयोवृद्ध मतदार देखील उन्हाच्या पहिले मतदान करण्यास मतदान केंद्रावर पोहोचत आहे. वर्ध्यात ११ वाजेपर्यंत १५.७६ टक्के मतदान झाले आहे.

भाजप उमेदवार रामदास तडस यांनी सकाळी ९.३० वाजता यशवंत माध्यमिक कन्या शाळा देवळी येथे संपूर्ण कुटुंबासह मतदान केले. तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांनी ९:४५ला आपल्या कुटुंबासह हिंगणघाट येथे मतदान केले.

Similar News