विखे पाटील आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार... पण ‘तो’ उमेदवार सोडून

Update: 2019-03-30 10:58 GMT

आज कॉंग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जुन खर्गे यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील हे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.

दरम्यान, या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील देखील हजर होते. सुजय विखे यांनी भाजपची उमेदवारी घेतल्यापासून राधाकृष्ण विखे कॉंग्रेसच्या बैठकांना साधारणपणे हजर राहत नव्हते. मात्र, आज ते या बैठकीला हजर होते. यावेळी विखे पाटलांना आपण प्रचार करणार का? असं विचारलं असता. आपण कॉंग्रेसचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे आपण आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं आहे. मात्र, अहमदनगरमध्ये आपण आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करणार नसल्याचं विखे यांनी स्पष्ट केलं आहे.

Similar News