chembur: चेंबूरमध्ये शौचालयाच्या टाकीत ट्रक फसला, तिघे अडकले

Update: 2019-04-03 09:07 GMT

आज चेंबूरमध्ये मोठा अनर्थ टळला. चेंबुरच्या वाशीनाका येथील म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेफ्टिक टँक खचल्यानं त्यावर उभा असलेल्या ट्र्क त्यात फसला. या टाकीत तीन जण अडकले होते. टाकीत अडकलेल्या एका महिलेसह दोन जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आरसीएफ पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत बाहेर काढले. जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/314536379229824/?t=0

 

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/770894973292794/?t=0

 

 

 

 

 

Similar News