लोकसभेमध्ये तीन तलाक विधेयक (Triple Talaq Bill) पास झाल्यानंतर आज कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीन तलाक विधेयक राज्यसभेत मांडले. राज्यसभेत या बिलावर साधारण चार तास चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने, कॉंग्रेसने आणि तृणमूल कॉंग्रेसने आपल्या पक्षातील खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत झालेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूने 99, तर विरोधात 84 मतं पडली.