वायूसेना प्रमुख बी.एस.धनोवा आणि नांबियार यांनी बठिंडा येथून मिसिंग मॅनची आकृती बनवलेल्या कवायती विमानातुन उड्डाण करून श्रद्धांजली वाहिली. वायूसेनेचे दोन प्रमुख अधिकारी पहिल्यांदा या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोन्ही वरिष्ठ अधिकारी कारगिल युद्धात सहभागी झाले होते
नांबियार, धनोवाच्या नंतर वायुसेना प्रमुख पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांनी कारगिल युद्धाच्यावेळी मिराज २००० विमान उडवले होते. तर धनोवा यांनी मिग - 21 ताफ्याची कमान सांभाळली होती.
कवायती विमानातून उड्डाण केल्यानंतर धनोवा म्हणाले की, राफेल विमानाच्या खरेदीचा सरकारचा निर्णय परिवर्तनकारी आहे. पुढे ते म्हणाले की, वायू सेनेने कारगिल युद्धानंतर आपली क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व विमान आधुनिक हत्यारांनी सुसज्ज आहेत.
कारगिल युद्धाच्या वेळी बॉम्ब हल्ल्यांसाठी फक्त मिरज २००० विमानातच लेजर पॉड यंत्रणा होती. मोठे मालवाहक हेलिकॉप्टर चिनूक आणि हेलीकॉप्टर अपाचे ही वायुसेनेची हेलीकॉप्टर्स वायुसेनेची क्षमता वाढवणारे आहेत.