ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. सततचा दुष्काळ, मोठ्या उद्योगांची कमतरता अशा परिस्थितीत बीड जिल्हा १७ व्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जातोय. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असूनही हा जिल्हा अनेक सुविधांपासून वंचित आहे. निवडणुका आल्या की ‘रेल्वे’चं आणि ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन हे समीकरणंही ठरलेलं. अशा परिस्थितीत बीडवासियांच्या मनात काय चाललंय, राजकीय पक्षांनी तर आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. मात्र, इथल्या लोकांना काय वाटतं याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी राज असरोंडकर यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांचा जाहीरनामा जाणून घेतलाय. हा जाहीरनामा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…बीड जिल्ह्यातल्या जनतेचा जाहीरनामा हा जाहीरनामा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://youtu.be/Qy9AJKftlSw