सरकारच्या विरोधात उघड बोलत असल्यामुळे तुमच्यावर ही ईडी वगैरे कारवाई करू शकते असं अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात. माझं ओपन चॅलेंज आहे, ईडी ने मला नोटीस देऊन दाखवावी. काही नाहीच तर काळजी कशाला करायची असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट ईडी लाच आव्हान दिलं आहे.
ईडीने नुकतीच राज ठाकरे यांची कोहीनूर व्यवहार प्रकरणी चौकशी केली होती. यामुळे जवळपास सर्वच विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये घबराहट पसरलीय. मध्यंतरीच्या काळात सुप्रिया सुळे यांच्यावर ही जमीन खरेदीचे अनेक आरोप काही आरटीआय कार्यकर्त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर सुळे यांचं थेड ईडी ला आव्हान हा सध्या चर्चेचा विषय आहे.
आता ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे, सत्ता असताना सर्व ठीक होतं. गाडी-एसी सगळं पण आता संघर्ष करायचाय आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत असं ही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.