शिवसेनेनं ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळं भाजपनं अखेर सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. यासंदर्भात ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर संजय दिना पाटील यांना मात्र शिवसेनेच्या नाराजीमुळं नाही तर सरकारची निष्क्रियता झाकण्यासाठी भाजपनं उमेदवार बदलल्याची प्रतिक्रिया दिलीय.