... तर पंतप्रधान थापा मारणार नाहीत - आठवले

Update: 2019-05-13 03:37 GMT

रामदास आठवले त्यांच्या कवितेनं नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षात एखादा नेता नाराज असेल तर ते त्या उमेदवाराला त्यांच्या पक्षात य़ेण्याचे आमंत्रण देण्यात ते मागे पुढे पाहत नाहीत. कधी ते डोनाल्ड ट्रम्प भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. तर कधी संसदेत कविता करत संसदेत हशा पिकवतात. मात्र, आता त्यांनी वेगळीच कमाल केली आहे.

आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी थापा मारतात, या विरोधकांच्या आरोपाला एक प्रकारे दुजोरा देत

‘मोदींना पुन्हा एकदा संधी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी थापा मारणार नाहीत’. असं म्हणत एक प्रकारे विरोधकांच्या आरोपाला दुजोरा दिला आहे.

आठवले हे सध्या महाराष्ट्रात दुष्काळी दौऱ्यावर असून त्यांनी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले यांनी मोदींना पुन्हा एकदा संधी दिली तर ते थापा मारणार नाहीत. असं म्हणत मोदींना घरचा आहेर दिला आहे.

Similar News