... आणि पवारांचा अंदाज चुकला.

Update: 2019-06-01 15:04 GMT

पवारांना राजकीय घडामोडींचा अंदाज लवकर येतो असं म्हटलं जातं. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांचे सर्व राजकीय अंदाज चुकले. आज लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बलस्थानाबरोबरच निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष कुठे कमी पडला? याबाबत चर्चा करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात बोलताना…

देशात सत्ताबदल होणार, असे अनेक अभ्यासक, जाणकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे मत होते.. मात्र झाले उलटेच, लोकसभा निवडणुकांचा निकाल अत्यंत वेगळा लागला. आज देशात बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सर्व गोष्टींचा फटका सरकारला बसणार होता, मात्र पंतप्रधान मोदींनी सोयीस्कर आढावा घेत प्रचाराचे सूत्रच बदलले.

समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सोयीस्कररीत्या केला. लोकांच्या भावनेला आवाहन करून त्यांनी प्रखर राष्ट्रवाद मांडला आणि प्रचाराची दिशाच बदलून टाकली.

असं म्हणत मोदींनी बदललेल्या प्रचाराच्या सुत्रांमुळे अभ्यासक, जाणकार, पत्रकार, राजकीय नेते यांच्या अंदाजासह पवारांनी मांडलेला अंदाज कसा चुकीचा ठरला यावर पवारांनी आज भाष्य केलं.

Similar News