Max Maharashtra Impact : अखेर त्या दिव्यांगाच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार

Update: 2022-02-21 11:08 GMT

हक्काचे घर पडल्यावर दोन वर्ष समाजमंदिरात राहावे लागले, पाठपुरावा करुनही दिव्यांग कुटुंबाला हक्काचे घरकुल मिळाले नव्हते. मॅक्स महाराष्ट्राने या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर आता दत्ता गोड चोर यांना हक्काचे घरकुल मंजूर झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यामध्ये असलेल्या गाजीपुर टाकळी या गावांमध्ये दत्ता गोड चोर यांचे कुटुंब घरकुल मिळावे यासाठी सात वर्षापासून प्रतीक्षा करत होते. शिवाय मातीचे घर खचल्यामुळे या कुटुंबाला दोन वर्षापासून समाज मंदिरांमध्ये राहावे लागत होते. गुंड चोर यांच्या कुटुंबामध्ये दत्ता यांच्यासह त्यांचे भाऊ सुद्धा दिव्यांग आहेत.

जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यामध्ये असलेल्या गाजीपुर टाकळी या गावातील दत्ता गोंड चोर हे दिव्यांग व्यक्ती त्यांच्या परिवारासह गेल्या दोन वर्षापासून गावामध्ये असलेल्या समाज मंदिरामध्ये वास्तव्य करीत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्यापही हक्काचे घरकुल न मिळाल्याने त्यांना गावातील विकृतींचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व आई वडील वृद्ध असल्याने दत्ता यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सात वर्षांपूर्वी दत्ता यांनी घरकुल योजनेकरिता अर्ज दाखल केला होता. घरकुल मिळेल या आशेने मातीच्या घरात ते वास्तव्य करीत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी संपूर्ण घर खचल्यामुळे शेजारी यांचा दबाव वाढत असल्याने घर पाडून टाकावे लागले. ग्रामपंचायतीने गावातील समाज मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी सांगितले. आपल्याला लवकरच घरकुल दिले जाईल असे सांगण्यात आले होते.

जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यामध्ये असलेल्या गाजीपुर टाकळी या गावातील दत्ता गोंड चोर हे दिव्यांग व्यक्ती त्यांच्या परिवारासह गेल्या दोन वर्षापासून गावामध्ये असलेल्या समाज मंदिरामध्ये वास्तव्य करीत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्यापही हक्काचे घरकुल न मिळाल्याने त्यांना गावातील विकृतींचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व आई वडील वृद्ध असल्याने दत्ता यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सात वर्षांपूर्वी दत्ता यांनी घरकुल योजनेकरिता अर्ज दाखल केला होता. घरकुल मिळेल या आशेने मातीच्या घरात ते वास्तव्य करीत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी संपूर्ण घर खचल्यामुळे शेजारी यांचा दबाव वाढत असल्याने घर पाडून टाकावे लागले. ग्रामपंचायतीने गावातील समाज मंदिरामध्ये यांना राहण्यासाठी सांगितले. आपल्याला लवकरच घरकुल दिले जाईल असे त्यावेळी आश्‍वस्त करण्यात आले होते. मात्र दोन वर्ष उलटून गेले असताना सुद्धा कुठलाही प्रकारचा लाभ या कुटुंबाला मिळाला नाही. शिवाय दत्ता यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्यासह त्यांचे भाऊ देखील दिव्यांग होते.

Max Maharashtra ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचा उदासीनपणा उघड केला व या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेतली असून संबंधित कुटुंबप्रमुखाच्या खात्यात घरकुलाचा निधी वर्ग झाला आहे. दत्ता गोड चोर यांनी यासंदर्भात Max Maharashtra चे आभार मानले आहेत.घरकुलासाठी निधी वर्ग झाल्यानं दत्ता चोर समाधान व्यक्त केल आहे.

मूळ बातमीची लिंक :

https://www.maxmaharashtra.com/max-reports/handicap-peroson-in-akola-deprived-from-gvoverment-gharkool-scheme-1099707

Similar News