शहीद हेमंत करकरे आणि महाराष्ट्र पोलिस दलाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मध्यप्रदेशमधल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मोठ्या प्रचारसभा दिसत नाहीयेत.
तर दुसरीकडे धार्मिक विधी, आणि धार्मिक कार्यक्रमांना त्या आवर्जून उपस्थिती लावत आहेत. भोपाळमध्ये आयोजित परशूराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी त्यांच्याशी बातचीत केलीय. यावेळी धर्म आणि सत्याचा विजय होईल, असं मत प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केलंय.