विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामा दिला आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा अपेक्षितच होता. आपल्यासोबत काँग्रेसचे ८-१० आमदारही काँग्रेस सोडणार असल्याचा दावा विखे-पाटील यांनी केला होता. मात्र, यावेळी विधानभवनात विखेंसोबत सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्यानंच राजीनामा दिल्याचं विखे-पाटील यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांना सांगितलं.