देशात प्रादेशिक भाषिक प्रिन्ट वाचकांमुळे वाचकांची संख्या 42 कोटींवर 

Update: 2019-04-30 08:37 GMT

देशात ऑनलाईन न्यूजची माध्यमं वाढत असताना प्रिन्ट मीडियाला धोका पोहोचू शकतो. अशी शक्यता व्यक्त केली जात असताना दिवसेंदिवस वृत्तपत्र वाचकांची संख्या वाढत असल्याचं मीडिया रिसर्च यूजर्स काउंसिलने केलेल्या सर्वेमध्ये समोर आलं आहे.

मीडिया रिसर्च यूजर्स काउंसिल (एमआरयूसी) यांनी 2019 च्या पहिल्या तीन महिन्यांचा इंडियन रीडरशिप सर्वे (आईआरएस) म्हणजे वृत्तपत्र वाचकांचा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये देशातील प्रिंट उद्योग वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. इंडियन रीडरशिप सर्वेने 2017 च्या सर्वेचा तुलनात्मक अभ्यास करुन ही आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार देशात 2017 पासून आत्तापर्यंत वृत्तपत्र वाचकांच्या संख्येत 1.8 कोटी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे प्रिन्ट मीडियाशी नव्यानं 90 लाख नवीन वाचक जोडले म्हटलं आहे.

या वाढीमध्ये इंग्रजी वृत्तपत्रापेक्षा हिंदी वृत्तपत्राच्या वाचकांची संख्या सर्वाधिक असल्याचं रिपोर्टमधील आकडेवारी वरुन स्पष्ट होते. या वाचकांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. या सर्वेनुसार प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचकांची संख्या देखील वाढत आहे.

देशातील पहिल्या १० वृत्तपत्रामध्ये इंग्रजीमधील फक्त एकाच वृत्तपत्राचा समावेश आहे. ते म्हणजे 'द टाइम्स ऑफ इंडिया' तर दुसरीकडे दैनिक जागरण पहिल्या क्रमांकावर असून दैनिक जागरणच्या वाचकांची संख्या ७ कोटी ३६ लाख ७३ हजार आहे. तर

टाइम्स ऑफ इंडिया च्या वाचकांची संख्या एक कोटी 52 लाख 36 हजार झाली आहे. टाईम्स ऑफ इंडिया देशात नवव्या स्थानावर आहे. तर दैनिक भास्करच्या वाचकांची संख्या 5.14 कोटी आहे. दैनिक भास्कर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे अमर उजाला च्या वाचकांची संख्या 4.76 कोटी आहे.

हिन्दुस्तान आणि हिन्दुस्तान टाइम्स चे आकडे यामध्ये सांगण्यात आले नसून या वृत्तपत्रांच्या सर्वेवर काम सुरु असल्याचं म्हटलं आहे. प्रादेशिक भाषांमध्ये येत असलेल्या वृत्तपत्रांच्या आवृत्यांमुळे वृत्तपत्रवाचकांची संख्या 42 कोटींवर गेली आहे.

Similar News