आचारसंहितेचा बडगा दाखवून राफेल स्कॅम वरील पुस्तक प्रकाशन रोखण्याचा डाव अखेरिस यशस्वी होऊ शकला नाही. सामाजित कार्यकर्ते विजयन यांनी लिहिलेल्या ‘राफेल स्कॅमः ज्यामुळे देश हादरला’ या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी आणण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या प्लाइंग स्कॉड ने केला होता, मात्र प्रकाशकांनी निवडणूक आयोगाकडूनच परवानगी आणल्यामुळे या प्रकाशनावर बंदी आणण्याचा डाव उधळला गेला.
विजयन यांनी राफेलवर लिहिलेल्या पुस्तकाची किंमत अवघी दहा रूपये इतकी आहे. या पुस्तकाचं प्रकाशन करणे म्हणजे आचारसंहिता भंग करण्याचा प्रकार असल्याचं लेखी पत्र प्रकाशकांना फ्लाइंग स्कॉड ने दिलं होतं, अशा पद्धतीने प्रकाशन थांबवण्याचा प्रकार हा निंदनीय असल्याचं मत द हिंदू चे संपादक एन. राम यांनी व्यक्त केलंय. प्रकाशकाच्या कार्यालयातून फ्लाइंग स्कॉड ने पुस्तकाच्या १५० प्रती ताब्यात ही घेतल्या होत्या, त्या त्यांनी नंतर परत केल्या, मात्र आचारसंहितेच्या नावाखाली असा प्रकार करणे भयानक असून आपल्याला काहीही करण्याचा अधिकार मिळाल्याचा त्यांचा समज झालाय अशी जहरी टीकी एन. राम यांनी केली आहे. काल संध्याकाळी एन. राम यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.