'भारतात बुरखा बंदी करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

Update: 2019-05-01 05:47 GMT

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आजच्या सामानातून भारतात बुरख्यावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. देशात 'बुरखा' तसेच 'नकाब'वर बंदी आणू नये, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून ‘हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी’, अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं शिवसेनेनं आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

'बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात. ज्या महिला दहशतवादी आहेत, त्यांचा बुरखा हटवण्यात आला पाहिजे. पण बुरखा परिधान करणं ही एक परंपरा आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये',

असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंनी सामनातून केलेल्या मागणीला विरोध दर्शवला आहे.

Similar News