लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साधारणतः दहा उमेदवारांना पराभवापासून वंचित ठेवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा विधानसभेसाठी आघाडी होईल की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत काँग्रेससाठी वंचित आघाडीनं समाधानाकारक भूमिका घेतलीय.
पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा-लाखेवाडी या गटासाठी पोटनिवडणूक होतेय. रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता या काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच अंकिता यांना पाठिंबा दिला आहे.