मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बेगुसरायमधील उमेदवार तथा जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमारला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे.
बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून कन्हैय्याकुमार निवडणुक लढवतोय. काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या धोरणात सीपीआय आणि आमच्यात मतभेद आहेत.
मात्र, भाजप आणि हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांविरोधात काँग्रेसचं धोरणं स्पष्ट आणि पुरेसं नाही. मात्र, तरीही पक्षीय भूमिकेपलिकडे जाऊन मोदी सरकारच्या दडपाशाहीचा बळी ठरलेल्या कन्हैया कुमार हा आरएसएस आणि भाजपविरोधातील नव्या पिढीचा आवाज आहे. त्यामुळं कन्हैयाला पाठिंबा दिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
कॉंग्रेस पक्ष कन्हैयासाठी ही जागा सोडून त्याला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. हा आवाज संसदेमध्ये पोहचावा आणि संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव व्हावा, या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कन्हैय्या कुमारला बेगुसराय लोकसभा मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.