#naxalattack : गडचिरोलीत नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १६ जवान शहीद

Update: 2019-05-01 08:56 GMT

ठळक बाबी

महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांचा हल्ला

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला

हल्ल्यात १५ जवान शहीद

ऐन महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री (1 मे) दादापूर येथे नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर नक्षल्यांनी पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले आहेत. खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावं लागल्यानं गृहविभागावर शोककळा पसरली आहे.

मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर १ मे च्या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असतांना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. त्यात १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षल्यांशी चकमक सुरु आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या चारही निवडणूकांचे टप्पे पार पडल्यानंतर नक्षल्यांनी हा स्फोट घडवला आहे.

Full View

Similar News