...शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे
निवडणुकांच्या काळात नेत्यांच्या भाषणातून गायब झालेला दुष्काळ पुन्हा एकदा नेत्यांच्या अजेंड्यावर आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन सध्या विरोधकांनी सरकारवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. त्यातच शेवटचे मतदान संपताच शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केल्यानं सरकारला निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती करावी लागली. दुष्काळी दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी सरकार दुष्काळ निवारणासाठी काहीच करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर आजच्या सामनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.
काय म्हटलंय सामनात?
- विरोधक दुष्काळाचे राजकारण करू पाहत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
''महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे. मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा!'',