मोदींचे ‘ते’ विधान नेटिझन्सच्या रडारवर,  ‘त्या’ विधानावरुन उडवली जातेय मोदींची खिल्ली?

Update: 2019-05-12 13:54 GMT

आज देशात लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यासाठी देशात मतदान पार पडत आहे. त्या अनुशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्याच्या पुर्वसंध्येला ‘न्यूज नेशन’ या खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. या मुलाखतीत बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी

‘तज्ञ हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता’

अशा प्रकारचं विधान मोदींनी केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर मोदींवर नेटिझन्सनी चांगलीच टीका केली आहे. दरम्यान मोदींचे हे विधान गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. मात्र, मोदींच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याने भाजपने हे ट्विट डिलीट केलं आहे.

पाहा काय म्हटलंय नेटिझन्सनी

Full View

Similar News