नमो टीव्ही कडे कुठल्याही पद्धतीचं लायसन्स नसताही काही डीटीएच वाहिन्यांनी नमो टिव्हीचं प्रसारण केलं होतं. या वाहिनीवर मोदींच्या योजनांच्या जाहीराती दाखवण्याचं काम सुरू होतं. या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर आयोगाने या प्रकरणाची चौकशी केली आहे.
नमो टीव्ही ने प्रसारित केलेल्या कुठल्याच कार्यक्रमांना आयोगाची पूर्वमान्यता नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. काही डीटीएच वाहिन्यांनी प्लॅटफॉर्म सर्विस म्हणून भाजपाला सशुल्क प्रसारणाची परवानगी दिल्याचं आयोगासमोर मांडण्यात आलं. त्यानुसार आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नमो टीव्हीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमो टीव्ही वरचे सगळे कार्यक्रम हे राजकीय पक्षातर्फे प्रायोजित असल्यामुळे या संदर्भात आयोगाने तसंच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांप्रमाणे कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.