बहिष्कार टाकलेल्या गावांबाबत मुंडे बंधु-भगिनींचं वक्तव्य

Update: 2019-04-18 10:41 GMT

बीड जिल्ह्यातली अनेक गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. याची गंभीर दखल सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतलीय. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बहिष्कार टाकलेल्या गावांबाबत परस्परांचं नाव न घेता टीका केलीय.

मतदानानंतर पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी बहिष्कार टाकलेल्या गावांबाबत विचारलं असता पंकजा यांनी दुष्काळाची परिस्थिती ही सरकारमुळं झालेली नाही, अशी मतदारांची भावना असल्याची प्रतिक्रिया दिलीय. तर दुसरीकडे बहिष्कार टाकावं लागणं हे सरकारच अपयश असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केलीय.

Similar News