मायावती महागठबंधनच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार ?

Update: 2019-04-09 08:42 GMT

विरोधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाआघाडी (महागठबंधन)चा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनी स्वतःलाच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायला सुरूवात केलीय.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा आणि भाजपचा प्रचार शिगेला पोहोचलाय. बसपा अध्यक्ष मायावतींनी गौतमबुद्ध नगरमध्ये एका सभेदरम्यान त्या कशा पद्धतीनं पंतप्रधान होऊ शकतात, हे सांगितलं. उत्तर प्रदेशानं साथ दिली तर लोकांच्या समस्या सोडवण्यापासून त्यांना कुणी रोखू शकत नाही, असं मायावती म्हणाल्या.

आमच्या महागठबंधनला उत्तर प्रदेशातून चांगलं यश मिळाल्यास मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पंतप्रधान झाल्यानंतर जनतेच्या समस्या चुटकीसरशी सोडवण्याचं आश्वासनही मायावतींनी यांनी यावेळी दिलं. मी उत्तर प्रदेशची मुलगी आहे. तुमची बहीण आहे, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. मायावतींनी भाजपासह काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. भाजपा आणि काँग्रेस एकसारखेच पक्ष आहेत. 2014मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न करणाऱ्या भाजपाला निवडणूक जाहीरनामा काढण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही मायावतींनी केली.

Similar News