मी ट्वीटरचा पूर्ण ट्रेंड तपासला, पहिलं ट्वीट एका भाजपा समर्थक ट्वीटर हँडल वरून झालंय काल रात्री. त्याआधी एका भाजपा समर्थक लेखक-ब्लॉगरने ट्वीट केलं मसूद मेला म्हणून. ज्या ब्लॉगची लिंक व्हायरल झाली त्यावर ही एकच बातमी आहे, बाकी चर्चेतल्या लोकांचे विकीपिडीया प्रोफाइल आहेत.
मसूद अझहर डेड या ट्रेंड मध्ये सामील 90 टक्के लोक हे भाजपाचे रेग्युलर ट्रोल अकाऊंट आहेत आणि ते भारतातील विविध नेते, पत्रकार यांच्या विरोधातच पोस्ट टाकत आहेत.
आज अचानक मसुद मारला गेल्याच्या ज्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या चालवल्या त्यात रिपब्लिक टीव्ही, न्यूज 18, झी न्यूज आणि टाइम्स नाऊ या वाहिन्या होत्या. या सर्व वाहिन्या सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देत आहेत. आता संध्याकाळी ट्वीटर ट्रेंड चा सूर बदलत असून पाकिस्तान ने भारताचं लक्ष विचलित करण्यासाठी असा ट्रेंड पेरला असावा असं म्हटलं जात आहे.
आजच्या ट्वीटर ट्रेंड मध्ये अनेक ट्वीट नरेंद्र मोदीं यांची वाहवा करणारे आहेत. त्याचप्रमाणे मसूद अझहर एअर स्ट्राइक मध्येच मारला गेला असा दावा करणारे आहेत. या सर्व घडामोडींमध्ये खरी बातमी इतकीच आहे की, मसूद अजहर हा पाकच्या लष्करी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याचं पाकिस्तान ने जाहीररित्या मान्य केलं होतं. एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला लष्करी रूग्णालयात उपचार देण्याची बातमी पाकिस्तानची दहशतवादासंदर्भात भूमिका पुराव्यानिशी सिद्ध करणारी आहे.