सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार जयसिध्देनश्वमर महास्वालमी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मालकांच्या (आमदार प्रशांत परिचारक) कानात सांगितलं की विठुरायाला सांगितल्यासारखं आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. ते लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यायतील गोपाळपूर येथे प्रचार सभेचे बोलत होते.
याठिकाळी जयसिध्देंश्वार महास्वानमी यांच्यार भाषणावेळी एका युवकाने गावीतील समस्याप सांगत भर सभेत घोंधळ घातला. यामुळे सभा आटोपती घ्यावी लागली. गोंधळ घालणाऱ्या युवकास समजावून सांगताना जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की, ‘आहेत ना मालक, कशाला त्रास करून घेतोस, एकदा मालकांच्या कानात सांगितलं की विठुरायाला सांगितल्यासारखं आहे’.यापूर्वी ही महास्वामींनी मीच देव आहे, पंढरपूर, तुळजापूर ला जाण्याची गरज नाही. जरी तुम्ही गेलात तर देव तुम्हाला भेटणार नाही, देव भेटला तर पुण्य मिळणार नाही असे वक्तव्य करून वाद निर्माण झाला होता.
या दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी युवकाची समजुत काढून शांत करण्यातचा प्रयत्नम केला. माञ, एकीकडे नागरिक आपल्याद समस्याा सांगत असताना प्रचार सभेसाठी आलेले स्टेाज वरील नेते आईस्क्रीणम खाण्या,त दंग होते.