धारावी हे स्वतःमध्ये एक वेगळं जग आहे. धारावीत काय आहे हे विचारलं तर उत्तर मिळते धारावीत काय नाही. भंगार वस्तूवर पुनप्रक्रिया करण्याचा लाखोंची उलाढाल असलेला व्यवसाय चालतो. लहान मोठे सगळे कारखाने मिळून जवळपास 300 व्यावसायिक इथे काम करतात त्यांच्या या कामात अनेक कामगार काम करतात.कोरोनाच्या विळख्यात गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन चा फटका याट व्यावसायिकांवर, कामगारांवर झाला आहे.
प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे या धंद्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला असून येथिल बहुतेक लहान मोठ्या व्यवसायिकांनी आपला व्यवसाय हा विरार आणि वसई भागात नेला आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल आणि हजारोंना रोजगार देणाऱ्या व्यवस्थेला कोरोनामुळे अखेरची तिलांजली मिळाली आहे.