सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदार संघांचा समावेश असून अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात मतदान होत असून नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.
देशात कोणत्या राज्यात होतंय मतदान?
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान आज मतदान होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि ओडिशा पश्चिम बंगाल या राज्यात देखील आज लोकसभेच्या पहिल्या टप्यातील काही जागांवर मतदान पार पडत आहे.
उत्तर प्रदेश – ८
बिहार – ४
आसाम -४
अरुणाचल प्रदेश – २
पश्चिम बंगाल – २
जम्मू-काश्मीर -2
मेघालय - 2
आणि मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा छत्तीसगडमधील माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या बस्तर मतदारसंघातही आज मतदान पार पडणार आहे.