अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीरप्रश्नी भारताने विनंती केल्यास हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत लोकसभेत काँग्रेसने गदारोळ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा अशी मागणी केली. शिमला आणि लाहोर करारानुसारच पाकिस्तान सोबत चर्चा पार पाडली जाईल असा खुलासा परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सभागृहात केला.
भारतातर्फे अमेरिकेला हस्तक्षेपाची कुठलीही विनंती करण्यात आली नसून द्वीपक्षीय चर्चेद्वारेच हा प्रश्न सोडवला जाईल, बाहेरचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही असं ही भारत सरकार तर्फे सांगण्यात आलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भेट घेतली. या भेटीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर प्रकरणी अमेरिकेचा हस्तक्षेप मागितला होता अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या. जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या बातम्या आल्या. यावरून काँग्रेसने लोकसभेत मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले.
https://youtu.be/7bBmH3GEOqk