मुंबई शहरात कचरावेचक महिलांची संख्या हजारोंच्या घरात आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच त्या कचरा, भंगार गोळा करण्यासाठी घराबाहेर पडतात. सतत कचऱ्यात वावर असल्यामुळे अनेक महिलांना त्वचेच्या रोगांची लागण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मथुरा येथे कचरा उचलणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी एकल-वापर प्लास्टिकविरूद्ध मोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान पतंप्रधानांच महिलांशी गप्पा मारल्या, वर्गिकरणाच काम कसं केलं जातं याची पाहणी केली.
मात्र, या सर्वांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली की रेड कारपेटवर कोणत्याही कचऱ्याचं वर्गिकरण केलं जातं नाही. या ठिकाणी रेड कारपेटवर कचऱ्याचं वर्गिकरण केलं गेलं त्यामुळे एक प्रश्न उपस्थित राहतो. कारपेटवर चर्चा करुन कचरावेचकांच्या जीवनाचा संघर्ष समजणार आहे का?
https://youtu.be/PMsa2SlC3zo