आपली सीट लागली तर तुम्हाला पाच लाख मिळतील, असं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.
भाजपा-शिवसेना-रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना पृथ्वीराज देशमुख यांनी,
‘सांगलीची सीट सोपी नाहीय त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरात काम सुरू करावं, संजयकाका पुन्हा निवडून आले तर तुम्हाला पाच लाख किंवा जास्त ही पैसे मिळू शकतात. विनोदाचा भाग सोडला तर संजय काकांनी चांगलं काम केलेलं आहे.’