लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते त्यांच्या भाषणात वारंवार सेनेचा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर हद्दच केली आहे. भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री गाझियाबाद येथे जाहीर प्रचार सभेत केले आहे. दहशतवादाला आळा घालण्यात विरोधक अपयशी ठरल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. ते गाझीयाबाद मतदारसंघात केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
“काँग्रेसच्या नेत्यांनी दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली तर मोदींच्या सेनेने दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (गोलाबारुद) दिला आहे. हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. मसूद अझरसारख्या अतिरेक्याच्या नावापुढे काँग्रेस नेते आदरार्थी ‘जी’ लावतात आणि दहशतवादालाच प्रोत्साहन देतात.”
कम्युनिस्ट पक्षाची निवडणूक आयोगात तक्रार
योगींच्या या वक्तव्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी लष्कर हे देशाचे आहे त्याची बांधिलकी एका पक्षाशी कशी असू शकते? त्यामुळे या अपप्रचारातून आदित्यनाथ यांनी मतदारांच्या मनात संभ्रम उत्पन्न केला आहे. असं म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय म्हटलंय डी. राजा यांनी…
Courtesy : Social Mediaभारतीय लष्कराचा ‘मोदी की सेना’ असा उल्लेख करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.