भारतात मोदी सरकार यावे ही तर इम्रानची इच्छा...

Update: 2019-04-10 07:42 GMT

देशात सध्या लोकसभा निवडणूका सुरु आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूकांसाठी उद्या 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान मोदी आपल्या भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करत कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहे. विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बोलत असतात. मात्र, इम्रान खान यांनी पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान व्हावेत असं म्हटल्यानं आता भाजप कडून यासंदर्भात काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं आहे.

काय म्हटलंय इम्रान खान यांनी...

इम्रान खान म्हणाले की, भारतात जर सत्ताबदल झाला तर येणारं सरकार हे पाकिस्तानसोबत समझोता करण्यापासून मागे हटू शकते.

जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर शांततेच्या चर्चेसाठी फायद्याचं ठरू शकतं.

भाजप जिंकल्यास काश्मीरमध्ये तडजोडीत काहीतरी होईल.

शांततेसाठी पुढे येण्याच्या दृष्टीने इम्रान खान म्हणाले की आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करू. यासाठी लष्कराचे पाकिस्तान सरकारला सहकार्य मिळत आहे.

Similar News