काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहा यांच्या विरोधात जोरदार हल्ला चढवत मोदींच्या 5 वर्षातील विकासावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं.’’ राज यांनी मोदी सरकारच्या जाहिराती कशा खोट्या आहेत हे पण सप्रमाण आलेल्या जनतेला दाखवलं. यावेळी राज यांनी देशातील मोदींनी पहिलं डीजिटल गाव घोषित केलेल्या हरसाल गावातील परिस्थिती दाखवली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा कसा खोटा आहे. हे ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून आपल्या सभेत दाखवून दिलं होते.
‘होय मी लाभार्थी’ जाहीरातीतील मॉडेलचीच मुलाखत दाखवून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कसे खोटे बोलतात हे राज यांनी दाखवलं होतं. मात्र, आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी घेतलेल्या या बाईटवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. यावर संदीप देशपांडे यांनी तावडे यांना मुद्यावर बोला असं म्हणत पुन्हा एकदा तावडे यांना चॅलेंज दिले आहे.