गडकरींची चिंता वाढली, ‘हे’ आहे कारण

Update: 2019-04-09 11:31 GMT

नागपूरसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत २०१४ मध्ये भाजपचे नितीन गडकरी लोकसभेवर निवडून आले होते. मात्र, २०१९ ला तशी परिस्थिती आहे का? तर निश्चितच नाही. कारण आज नागपूरमध्ये २०१४ प्रमाणे मोदी लाट दिसत नाही. त्यात काँग्रेसनं नाना पटोलेंच्या सारखा शेतीशी नाळ जोडलेला तगडा उमेदवार दिल्यानं गडकरींसमोरील अडचणी वाढलेल्या दिसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचा थेट आरोप करून नाना पटोले काँग्रेसमध्ये आले होते. आणि आताही ते प्रचारात शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडत आहेत.

सुरुवातीला नितीन गडकरी वन साईट निवडून येतील असं चित्र रंगवण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या निवडणुकीत गडकरी मोदी लाटेत तब्बल २ लाख ८५ हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आले होते. गडकरींना केंद्रात परिवहन आणि रस्ते विकास यासारखी महत्त्वाची खाती देण्यात आली होती. त्यानंतर गडकरी समर्थकांनी ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है नितीन गडकरी’ अशा पोस्टस् सोशल मीडियात अलिकडच्या काळात व्हायरल करत २०१९ साठी गडकरीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील असं सांगायलाही सुरूवात केली. कदाचित पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी विरूद्ध गडकरी या रंगवण्यात आलेल्या चर्चेचा फटकाही गडकरींना नागपूरमध्ये बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

या गडकरी vs नाना पटोले यांच्या या राजकीय लढाईमध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. तो म्हणजे ‘डीएमके’ फॅक्टर... काय आहे, हा डीएमके फॅक्टर? जो गडकरींना देऊ शकतो मात... हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ

Full View

Similar News