Fact Check : काय आहे 'या' फोटोमागील सत्य?

Update: 2019-04-24 16:47 GMT

राजकीय पक्ष आपल्या पक्षाला मतदान मिळावे म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यात भाजप पुढे असल्याचं दिसून येतं. मध्यंतरी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा दिल्याचा आणि त्यानं नरेंद्र मोदींना मत दिल्याचा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तो अजुनही व्हायरल होत आहे.

 

"विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भाजपाला उघड पाठिंबा दिला आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतही दिलं आहे. आताच्या काळात नरेंद्र मोदींशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती चांगली पंतप्रधान होऊ शकत नाही. मित्रांनो लष्कराच्या एखाद्या जवानास जिवंत परत कधीच आणले नाही हे जिहादी आणि काँग्रेसच्या लक्षात आणून द्या."

या आशयाची एक पोस्ट आजही व्हायरल होत आहे. मात्र, ही पोस्ट फोटोशॉप असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर राज यांनी आपल्या प्रचारसभांमधून एका कुटुंबालाच व्यासपीठावर बोलवत भाजपच्या आयटी सेलने एका जाहिरातीत एका कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचं उघड केलं. भाजपच्या धोरणांमुळे यांची गरीबी गेली असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. मात्र, या जाहिरातीमध्ये केलेला दावा आणि या कुटुंबाची वस्तुस्थिती वेगळी आहे हे राज यांनी समोर आणलं.

महिलेने खरंच पाठीवर कमळ काढले का?

त्यानंतर आता एका महिलेने तिच्या पाठीवर भाजपचे निवडणूक चिन्ह (कमळ) काढल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र जेव्हा आम्ही या फोटोची सत्यता तपासून पाहिली तेव्हा हा फोटो (Pattu Blouse Back Neck Designs Deep V-cut) या वेबसाईटवरील हा मूळ फोटो असून या फोटोवर फोटोशॉप करुन सदर महिलेच्या पाठीवर कमळ काढल्याचं स्पष्ट होत आहे.

 

त्यामुळे सदर महिलेने भाजपचं चिन्ह असलेलं कमळ पाठीवर काढलं नसल्याचं स्पष्ट होत असून ही प्रचारासाठी वापरलेली एक क्लुप्ती असल्याचं या फोटोतून स्पष्ट होते.

Similar News