गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं,पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत अशी घणाघाती टीका केली आहे. परभणीचे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी त्या जिंतूर येथील सभेत बोलत होत्या.
धनंजय मुंडे बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घराण्यात ते राणेशाही बोलतात पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात असं म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शरद पवारांवर निशाणा...
राष्ट्रवादीने अनेक घरात भांडण लावण्याचं काम राष्ट्रवादीने केले आहे, आमचं उदाहरण तर जगजाहीर आहे. असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला.