MAX MAHARARASHTRA IMPACT - मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

मॅक्स महाराष्ट्रचे आवाहन....मुख्यमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर...

Update: 2020-10-19 12:27 GMT

राज्यात गेल्या काही दिवसात परतीच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राचा किमान हवाई दौरा करावा अशी मागणी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी आपल्या अग्रलेखातून केली होती. अखेर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली. राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे, असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यसरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यात मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोटमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही पुरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली. रामपूर गावात त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली. नागरिकांना तातडीने मदत करावी, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.


मुख्यमंत्री महोदय, निदान हवाई पाहणी करा..

Tags:    

Similar News