पिपरी चिंचवड येथील नागरिकांना नक्की काय हवंय ? एक शहर एक लोकसभा मतदारसंघ असावा असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. शहराचं विद्रुपकीकरण थांबवावं, अनधिकृत पोस्टर्स थांबवली जावे, फुकट्या जाहिरातदारांविरुध्द कार्यवाही व्हावी, हे मुद्दे स्वच्छ भारतमध्ये यावे. त्याचबरोबर नद्यांचे प्रदुषण थांबवले जावेत .अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावावा. पंतप्रधान आवास योजनेत येथील जनतेला सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न व्हावा. शास्तीकर रद्द केला जावा. रेड झोनच्या न्यायालयीन प्रक्रियेला वेग दिला जावा. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील कामगारांना अचानक काढुन टाकले जाऊ नये, आयटी क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर मानसिक ताण दिला जातो तो कमी व्हावा. आयटी क्षेत्रातील प्रश्नांकडे लक्ष दिले जावे. नागरिकांना शाश्वत रोजगार मिळायला हवा . पालिकेतील काही भाग हा औद्योगिक पालीका म्हणुन घोषीत केला जावा. उद्योगाचा विचार केला तर स्थलांतरीत होणा-या उद्योगधंद्यांवर उपाय केले जावेत. उद्योगासाठीचं औद्योगीक व्हिजन खासदाराकडे असायला हवेत. प्रवासांच्या सोईसाठी मुंबई - पुणे लोकल सुरु केली जावी. निगडी ते शिवाजी नगर मेट्रो मार्ग एका वर्षात सुरू व्हावा. रोजगार उपलब्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड पर्यटन केंन्द्र म्हणुन विकसित व्हावे त्यात स्थानिक रोजगार तयार केले जावे. धरणांवर फ्लोटींग सोलर पॅनल लावले जावेत .
https://youtu.be/P-Jf3KPyazI