भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांनी भाजपचा जळगाव लोकसभा मतदार संघाचा उमेदवार बदलावा अन्यथा राज्यात गिरिश महाजन यांची मोठी नाचक्की होईल असा इशारा भाजपचे सहयोगी आमदार अंमळनेरचे शिरीष चौधरी यांनी दिलाय.
भाजपने या ठिकाणी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली असून यांच्या पती बाबत मतदार संघामध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावा चौधरी यांनी यावेळी केला आहे. भाजप तिकीट आपल्याला द्या, तिकीट देत नसतील तर आपण येत्या चार तारखेला अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं शिरीष चौधरी यांनी जळगाव येथे गिरिश महाजन यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
दरम्यान गिरीश महाजन तसंच आमदार शिरीष चौधरी यांची अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली
शिरीष चौधरी नेमके काय म्हणाले ऐका
https://youtu.be/aivDS468qcM