पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य लोकांच्या रोषाची भीती वाटतेय हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी अहमदनगर येथे सभा घेतली. या सभेला काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे काळे कपडे घालणाऱ्या नागरिकांना या सभेला बंदी घालण्यात आली होती.
विशेष म्हणजे ज्या लोकांनी काळ्या रंगाचं बनियान घातलं होतं त्यांना देखील ते बनियान काढायला लावलं आहे.