जेव्हा गडकरी म्हणतात भाजप मोदी-शाहांचा पक्ष कधीच होणार नाही

Update: 2019-05-11 05:09 GMT

अलिकडे भाजप म्हणजे मोदी आणि शाह अशीच ओळख झाली असल्याचं बोललं जातं. त्यामुळे भाजप हा व्यक्तीकेंद्रीत पक्ष झाल्याची चर्चा नेहमीच सुरु असते. पक्षाचे सर्व निर्णय हे मोदीच घेतात त्यामुळे भाजप हा मोदीकेंद्रित पक्ष झाल्याचं पक्षातील काही नेते खासगीत देखील बोलून दाखवतात. मात्र, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हे मान्य नाही.

गडकरी यांच्या मतं आमचा (भाजप) पक्ष कधीच व्यक्तिकेंद्रित होणार नाही, भाजप वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष झाला नाही. तसेच तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष होणार नाही. भाजप कधीच व्यक्तिकेंद्रीत नव्हता आणि होणारही नाही. कारण तो विचारधारेवर आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना आहे.

भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक आहेत, असेही गडकरी यांनी म्हटलं आहे.

त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीटीआयला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसंच यावेळी गडकरी यांनी भाजपला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

Similar News