प्रेमविवाहातून गोळीबार झालेला तुषार बचावलाय

Update: 2019-05-11 11:13 GMT

आंतरजातीय विवाह केल्यामुळं पुण्यातल्या चांदणी चौकात तुषार पिसाळ या तरूणावर पत्नीच्या नातेवाईकांनी गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपुर्वीच (८ मे) घडली होती. यातल्या जखमी तुषारवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषारच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

८ मे रोजी भोर तालुक्यातील भुगाव इथं एका लग्न समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर तुषार पुण्यात परतत होता. साधारणतः सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुषारच्या पत्नीचे काका, भाऊ आणि त्यांच्या साथीदारांनी तुषार पुण्यातल्या चांदणी चौकातील पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. यात सुदैवानं तुषार वाचला. राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे आणि सागर पालवे यांनी गोळ्या झाडल्याचं तुषारनं पोलिसांना सांगितलं. तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र, छाती आणि मानेत अशा दोन गोळ्या तुषारला लागलेल्या आहेत. यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय.

तुषारचं एक वर्षापूर्वी विद्या तावरेसोबत लग्न झालं होतं. या दोघांच्या लग्नाला विद्याच्या कुटुंबियांचा सुरूवातीपासून विरोधच होता. तर दुसरीकडे तुषारच्या कुटुंबियांचा मात्र या विवाहाला पाठिंबाच होता. अशा परिस्थितीत आता तुषारवरील हल्ल्यानंतर पुन्हा या दोन्ही कुटुंबियांच्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

पालकांनीही मुला-मुलींच्या भावनांचा विचार करावा – नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या

मुलीच्या कुटुंबियांनाच हा प्रेमविवाह मान्य नव्हता, शिवाय जातीयतेतूनच हा हल्ला झाला - संतोष पिसाळ, जखमी तुषारचा भाऊ

https://youtu.be/IKivZXkeBhg

 

 

 

 

 

 

Similar News