नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वार्शी येथे एका आदिवासी कुटुंबातील महिलेचे आजारामुळे निधन झाले आहे. तिचा पती मानसिक रुग्ण आहे. तिच्या पश्ताच 3 लहान मुली आणि तिने १५ दिवसांपूर्वी जन्म दिलेले आणखी एक मुल आहे. घरातील एकमेव कर्ती महिला गेल्याने सात जणांचे कुटुंब आता उघड्यावर पडले आहे. या कुटुंबाच्या मदतीसाठी पुणे येथील शिवनिश्चल या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी होळीचे औचित्य साधत या चार मुलांच्या शिक्षणाची आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे.