प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत

Update: 2024-02-27 06:27 GMT

Solapur : लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने महाविकास आघाडीची आज बैठक होत असून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत.

प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता. मात्र मंगळवारी पुण्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्य समिती उपस्थित राहणार असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. यावेळी त्यांनी जयंत पाटलाना बैठकीचा पर्याय दिला असून ही बैठक मंगळवारी ऐवजी बुधवारी घ्यावी असे त्यांना सांगितले असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची बैठक होत असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची महत्वाची भूमिका राहणार आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्यावरून सुद्धा तर्कवितर्क लावले जात आहेत. आज होणारी बैठक जागा वाटपाच्या संदर्भाने महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे. परंतु महविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडी या बैठकीला अनुपस्थित राहत असल्याने बैठक यशस्वी होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?